मांदाड येथे महिलेची हत्या

आरोपीला पोलिसांकडून अटक
| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यातील मौजे मांदाड येथे भरदिवसा महिलेची कोयतीने वार करून हत्त्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. येथील विठा लक्ष्मण पाटील वय वर्षे 60 या बंदर येथुन मच्छी घेऊन येत असताना आरोपी पांडुरंग लक्ष्मण मानकर याने सदर महिलेकडे मच्छी ची मागणी केली. परंतु सदर महिलेने मच्छी देण्यास नकार दिल्याने आरोपीने मोठमोठ्याने वाद करून कोयतीच्या सहाय्याने सदर महिलेच्या तोंडावर,डोळ्यावर व नाकावर गंभीर प्रहार करून जीवे ठार मारले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी व तळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Exit mobile version