। पनवेल। वार्ताहर ।
घरातून कामाला जाते असे सांगून बाहेर गेलेली महिला अद्याप घरी परतली नसल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सदर महिलेचे नाव हे डॉली हुसेन शेख असून तिचे वय 36 वर्षे, व्यवसाय घरकाम रंग-सावळा, केस काळे उंची अंदाजे 4 फुट 5 इंच, अंगाने मजबुत, चेहरा-गोल, नाक-सरळ, अंगात नेसुन-हिरव्या रंगाचा सलवार कमीज, पायात लाल रंगाची स्लीपर चप्पल भाषा-बंगाली, हिंदी बोलता येते अशा वर्णनाची सोबत ओपो कंपनीचा मोबाईल फोन आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे 8655354111 किंवा पोना रवींद्र पारधी 9326674656 यांच्याशी संपर्क साधावा.







