। पनवेल । वार्ताहर ।
पॅथोलॉजी लॅबमध्ये रक्त तपासणीसाठी गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीने लॅबमधील महिलेसोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग केल्याची घटना कामोठेमध्ये घडली. कामोठे पोलिसांनी लॅबमधील महिलेसोबत गैरवर्तन करणार्या व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील आरोपी हनुमंत माने कामोठेत राहण्यास असून तो आपल्या परिसरातील लॅबमध्ये रक्त तपासणी करण्यासाठी गेला होता. यावेळी सदर लॅबमध्ये 30 वर्षीय महिला रक्त संकलनाचे काम करत होती. यावेळी पिडीत महिलेने माने याचे रक्त तपासणीसाठी घेतल्यानंतर त्याच्या हातावरील रक्त कॉटनने पुसले. त्यानंतर सदर कॉटन डस्टबीनमध्ये टाकत असताना, माने याने तिला पाठीमागून मिठी मारुन तिच्यासोबत गैरवर्तन केले. या प्रकारानंतर पिडीत महिलेने आरडा ओरड केली. त्यानंतर तिने माने यांच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.