। पनवेल । प्रतिनिधी ।
रिक्षामध्ये पाठीमागे बसलेल्या अनोळखी व्यक्तीने दोन महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तक्रारदार आणि त्यांची बहिण ही भाजी खरेदी करण्यासाठी गेले असता रिक्षामध्ये पाठीमागे बसलेल्या अनोळखी व्यक्तीने तक्रारदार यांच्या बहिणीला डोळा मारून अश्लील हातवारे केले आणि स्वतःकडे बोलावून तिचा विनयभंग केला. यावेळी तक्रारदार ह्या विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपीने रिक्षामध्ये बसण्यास सांगून त्यांचा देखील विनयभंग केला.
अश्लील हातवारे करून महिलेचा केला विनयभंग
