। माणगाव । वार्ताहर ।
महिलेला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा 30 जानेवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील घोडशेतवाडी येथे फिर्यादी यांच्या घरासमोर घडला. याबाबतची फिर्याद कमल बाळाराम शिंदे(वय-62) रा.घोडशेतवाडी ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील फिर्यादी कमल बाळाराम शिंदे हे त्यांच्या घरासमोर अंगणात जेवणाची भांडी धुवत असताना यांतील आरोपी रामचंद्र गंगाराम खुटवळ रा.घोडशेतवाडी ता.माणगाव याने काही एक कारण नसताना फिर्यादी महिलेच्या पाठीमागून येऊन बांबूच्या काठीने तिच्या डोक्यात मारले. आरोपी याने पुन्हा काठीचा वार केला असता फिर्यादी महिलेने उजव्या हाताने तो अडवला असता त्यांच्या हाताला दुखापती करून शिवीगाळी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.या गुन्ह्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याच्या अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री.भोजकर हे करीत आहेत.