ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह

| माणगाव | प्रतिनिधी |

ताम्हिणी घाटातील धोकादायक आणि अपघातग्रस्त मुख्य वळणावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह 50 फूट खोल दरीत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली असावी आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दरीत फेकून दिला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळाची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्यासह पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. दरी खोल असल्याने स्थानिक नागरिक आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर या तरुणीचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. बेवारस अवस्थेत आढळलेल्या या महिलेची नेमकी हत्या झाली आहे की तिने आत्महत्या केली आहे, या दृष्टीने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, माणगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील वेगाने तपास करत आहेत.

Exit mobile version