| महाड | प्रतिनिधी |
महाड शहराजवळील दादली पुलाखाली सावित्री नदीच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. वैशाली विजय मांढरे असे या महिलेचे नाव असून, त्या शिरगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा घटनास्थळी होती. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्राला भरती असल्याने सावित्री नदीची पाणीपातळी वाढल्याने वैशाली पांढरे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला वाटसरूंच्या निदर्शनास आला. याबाबत त्यांनी तात्काळ महाड शहर पोलीस ठाण्यात कळविले असता पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महाड पोलीस पुढील तपास करीत असून वैशाली मांढरे यांचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.
दादली पुलाखाली महिलेचा मृतदेह
