बोंबले कुटुंबाचे तटकरेंकडून सांत्वन

| तळा | वार्ताहर |

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोनसडे येथे बोंबले कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. सोनसडे येथील अंगणवाडी सेविका सुरेखा बोंबले यांची सून जान्हवी अनिकेत बोंबले यांचे प्रसूती दरम्यान उपचार घेत असताना बालिकेसह निधन झाले.अंगणवाडी सेविका सुरेखा बोंबले यांच्या मुलाचे अवघ्या दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते.व त्यांच्या घरी आनंदाचे क्षण येणार तोच प्रसूती दरम्यान त्यांच्या सुनेचे व नातीचे निधन झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच रविवारी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोनसडे येथे बोंबले कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.याप्रसंगी त्यांच्या समवेत नाना भौड, चंद्रकांत रोडे, गीता जाधव, जान्हवी शिंदे,तहसीलदार स्वाती पाटील यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version