महिलांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ येथे गुरुचैतन्य सेवाभावी संस्था आणि रणरागिणी महिला मंडळ यांच्या माध्यमातून महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रणरागिणी महिला मंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या टेलरिंग आणि पार्लर कोर्सेस पूर्ण करणार्‍या महिलांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमानंतर महिलांसाठी आधार कार्ड नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रणरागिणी महिला मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित आधार कार्ड शिबिरात 200 जणांनी दुरुस्ती आणि नवीन नोंदणी केली. याप्रसंगी ज्योती देशमुख, मीना थोरवे, उषा पारधी, म्हात्रे, वर्षा बोराडे आदी प्रमुख उपस्थित होत्या.

Exit mobile version