केंबुर्लीत महिलांचा पिण्याच्या पाण्यासाठी आक्रोश

। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरा पासुन अवघ्या तीन किलो मिटर अंतरावर असलेल्या केंबुर्ली गावांमध्ये पिण्याण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली असताना पंचायतीचे सरपंच आणि सदस्यांकडून जाणीव पुर्वक दुर्लक्ष करण्यांत येत असल्याचा आरोप गावांतील महिलांनी केला आहे. गावांमध्ये गेल्या अनेक दिवसा पासून पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने महामार्गा ओलांडून पाण्या करीता जावे लागत असल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


महामार्गावरील वेैंबुर्ली गावामध्ये गेल्या अनेक वर्षा पासून पिण्याच्या पाण्याची समस्या असताना ग्रामपंचायतीकडून पाणी टंचाई दूर होण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप महिला करीत आहेत. गावाची लोकसंख्या सातशे पेक्षा अधिक असून स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. त्याच बरोबर महाड शहरापासून काही अंतरावर असल्याने गावाचा विस्तार देखील होत आहे. दिवसेंदिवस वाढणारी नागरी वसाहत आणि त्या करीता पुरविण्यात येणार्‍या सुविधामध्ये ताळमेळ नसल्याने ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या कारभारावर नाराज आहेत. महामार्गाचे काम सुरु असल्याने गावाला पाणी पुरवठा योजना नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे महामार्गाच्या पलिकडे असलेल्या पाईप लाईनच्या लिकेज झालेल्या व्हाल्वमधुन पाणी भरावे लागते. त्या करीता महामार्ग ओलांडून जावे लागत असल्याने जीवीताला देखिल धोका निर्माण झाला आहे.


केंबुर्ली गावाला पाण्याची सोय होण्यासाठी दत्तवाडी जवळच्या डोगरावर एक पाण्याची साठवण टाकी बांधण्यांत आली होती. परंतु या टाकींतुन पाण्याची गळती सुरु झाल्याने पावसाळ्यात टाकीमध्ये साठवलेले पाणी जानेवारी महिन्यात संपुन जाते. त्या नंतर पावसाळा सुरु होई पर्यत गावांमध्ये पिण्याच्या पाणी टचाईला सामोरे जावे लागते. गावांतील वृघ्द महिलांना पिण्याच्या पाण्या करीता दोन ते तीन किलो मीटर अंतरावी देखील कधी कधी पायपिट करावी लागत असल्याचे सांगण्यांत आले. या बाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करुनही त्याच्या तक्रारीची दाद घेतली जात नसल्याचे अकखाल घोले यांनी सांगितले. गावापासून सहा किलो मीटर अंतरावर असलेल्या मोहोप्रे गावाजवळ केंबुर्ली गावाला पाणी पुरवठा करणारी जॅकवेल असून त्यातून गावाला पाणी दिले जाते. रस्त्याच्या कामामध्ये जागो जागी पाण्याची पाईप लाईन पुटल्यामुळे पाणी टंचाई निर्माण होते.वास्तविक सदरची पाईप लाईन जोडण्याचे तसेच दुरुस्त करुन देण्याची जबाबदार एल अन्ड टी कंपनीचे असून दुरुस्त करुन देण्याची आश्‍वासन दिले जाते, परंतु प्रत्यक्ष कामे केली जात नाहींत. येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे देखील तक्रार करण्यात आली, परंतु या विभागाकडून देखीलल कार्यवाही होत नसल्याने गावांतील महिलांना पिण्याच्या पाण्या साठी यातना भोगाव्या लागत आहेत.

पावसाळ्यापासून जानेवारी महिन्यात पाण्याची समस्या जाणवत नाही. फेब्रुवारीनंतर पाण्यासाठी वणवण करावी लागते. वारंवार महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदारांकडून पाईप लाईनचे नुकसान होते. -अखलाख घोले, ग्रामस्थ

Exit mobile version