| खोपोली | वार्ताहर |
उन्हाच्या कडाक्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या राज्यात निर्माण झाली असताना खालापूर तालुक्यातील सहा गावे आणि चार वाड्यांवर दि. 27 एप्रिल पासून टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.टँकर गावात घुसताच महिला वर्गाची पाणी मिळविण्यासाठी झुंबड उडत असल्याचे चित्र या टंचाईग्रस्त गावात दिसून येत आहे.
तालुक्यातून बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी आहे मात्र या नदीला कारखान्याच्या प्रदूषणाने वेडले असल्याने या पाण्याचा पिण्यासाठी वापर करणे नागरिक टाळतात तर काही गावांनी पाणी शुद्धीकरण प्लांट बसवून या पाण्याचा वापर करीत असले तरी आबेक भागात बोरवेल मारून किंवा साठवण तलाव धरण यासह पाझर तलावाच्या पाण्यावर पाण्याची योजना राबविली असल्याने काही गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे मात्र तरी ही वावोशी, इसांबे ,उसरोली, चिलटन, उजळोली, खानाव या सहा गावामध्ये पाणी टंचाई च्या झळा बसल्या आहेत तर चिलठन बुध्दभूषण नगर, उजळोली आदिवासी वाडी, खानाव आदिवासी वाडी, खडई वाडी या चार वाड्यांना पाणी टंचाई फेब्रुवारी असल्यामुळे खालापूर पंचयत समिती कडे येथील ग्राम पंचयती नी टँकर ची मागणी केली असता तालुक्यात या टंचाई ग्रस्त गाव व वाड्या ना एप्रिल महिन्याच्या शेवटीला दोन टँकरने पाणी पुरवठा सुरू करून पाणी टंचाई वर मार्ग काढला असल्याने येथील महिला व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यापासून उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याचे स्तोत्र कमी झाल्यानंतर पाण्याची समस्या निर्माण होते अनेक ठिकाणी पाणी योजना राबविल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे मात्र तालुक्यातील सहा गावे आणि चार वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्याणाने ग्राम पंचयती मार्फत मागणी आल्याने टंचाईग्रस्त भागात दोन टँकर पाणी पुरवठा सुरू करून नागरिकांना दिलासा दिला आहे.तसेच या गावांमध्ये पाण्याचा साठी निर्माण होई पर्यत पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती सह्य गटविकास विकास अधिकारी खालापूरचे संजय चोपडे यांनी दिली आहे.