महिलांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे- काळे

| आगरदांड | वार्ताहर |

देश विकासासाठी महिलांचा सहभाग 12 टक्के आहे. अर्थ व्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी महिलांची भूमिका आणि योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अदानी फाउंडेशन वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे यांनी केले. आगरदांडा येथे अदानी फाउंडेशन माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमावेळी बोलत होत्या.

यावेळी सरपंच ऋषाली डोंगरीकर, उपसरपंच बाबासाहेब अर्झबेगी, दिघी पोर्टचे सत्येंद्र यादव, नितीन चांदोरकर, डॉ. सुनील पटेल, प्राजक्ता अडुळकर, दामिनी घागरी, अर्चना कासार, अवधूत पाटील उपस्थित होत्या. यावेळी रस्सीखेच, गोटीचमचा, संगीत खुर्ची अशा खेळामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरण्यात आले. तसेच सर्व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी आणि सीबीसी चाचणी , रक्ततपासणी अदानी फाउंडेशन माध्यमातून मोफत करण्यात आली. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्राजक्ता अडुळकर, दामिनी घागरी, अर्चना कासारे ग्राम सखी, अदानी फाउंडेशन चे अवधूत पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version