| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील महात्मा गांधी रोडवरील राजेंद्र कांतीलाल बांठिया ज्वेलर्स या सराफ दुकानात बुरखा परिधान करून आलेल्या दोन महिलांनी हातचलाखीने सोन्याची बांगडी लांबवल्याची घटना घडली. चोरट्यांनी मोराच्या डिझाइनची सुमारे 25 ग्रॅम वजनाची सोन्याची एक बांगडी चोरून नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दुकानाचे मालक गिरीश राजेंद्र बांठिया यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार अज्ञात महिलांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण अधिक तपास करीत आहेत.
बुरखाधारी महिलांनी चोरली बांगडी
