| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा यथोचित सन्मान कार्यक्रम शुक्रवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह माणगाव याठिकाणी संस्थेचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्याहस्ते व संस्था पदाधिकारी व सभासद यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी माणगाव नगर पंचायतीच्या सभापती शर्मिला सुर्वे, सुवर्णा जाधव, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण सोनाली तेटगुरे, परिचारिका शिवकांती गवळी, डॉ. केतकी क्षीरसागर, शर्मिला सत्वे, यशोधरा गोडबोले, स्वप्ना साळुंके, विनया जाधव, विनया ढेपे, अपूर्वा जंगम, कल्पना पाखुर्डे, दीप्ती मोरे आदी महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. सत्कारमूर्ती महिलांना संस्थेतर्फे आकर्षक सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.