सुकापूरमध्ये महिलांचे क्रिकेट सामने

। पनवेल । वार्ताहर ।
महिला दिनाचे औचित्य साधून क्रांतीज्योती महिला विकास फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एक दिवस जल्लोषाचा महिलांचे क्रिकेट सामने सुकापूर येथे आयोजित करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या पत्नी ममता म्हात्रे यांच्या हस्ते सामन्यांचे शुभारंभ करण्यात आले.
यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेल महापालिका उपायुक्त विठ्ठल डाके, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका सारिका भगत, तसेच महिला खेळाडू व प्रेक्षक उपस्थित होते.

Exit mobile version