ममता प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष कार्यालय खांदा कॉलनी येथे महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन शेतकरी कामगार पक्ष खांदा कॉलनी महिला आघाडी व जे. एम.म्हात्रे चॅरेटेबल संस्था यांच्यातर्फे दि. 5 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी महिलांना हळदीकुंकू लावून महिलांना वाण स्वरूपात तुळशीचे रोप देण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये खांदा कॉलनीमधील विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान जेएम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या ममता प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, नगरसेविका कुसुम पाटील, शेकाप महिला आघाडीच्या माधुरी गोसावी, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शशिकला सिंग, अमिता चव्हाण, क्रांती ज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या अध्यक्ष रुपाली शिंदे, रत्नमाला पाबरेकर उपस्थित होत्या.
तसेच सध्याच्या कोरोना काळामध्ये महिलांसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून सर्व भगिनींची आरोग्य संदर्भात रुटीन चेकअप करून रुटीन ब्लड चेकअप वर 50 टक्के सवलतीचे कार्ड भेट देण्यात आले. महिलांच्या आरोग्याविषयी जागृत राहून या सेवा दिल्याबद्दल उपस्थित सर्व महिला वर्गातून सर्वांचे आभार मानण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दर्शना भडांगे, निर्मला गुंडरे, किशोरी पाटील, नलिनी जाधव, अश्विनी जोगदंड, प्रिया गलांडे, सारिका लोखंडे यांनी परिश्रम घेतले.