। अलिबाग । वार्ताहर ।
जागतिक महिला दिनानिमित्त डिफेन्स अकॅडमीतर्फे अलिबागमधील जयमाला गार्डन येथे मोफत योगा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे फार गरजेचे आहे. आजच्या बदलत्या काळात रोज महिलांना वेगवेगळ्या संकटाना सामोरे जावे लागते, तरी अशा संकटांना निडर होउन तोंड देता यावा या हेतूने सदर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आला होता.
सदर शिबिरात महिलांना योगासने आणि स्वसंरक्षणाचे महत्व पटवून दिले आणि योगासनांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. महिलांच्या निरोगी शरीरासाठी आणि मन प्रसन्न राहण्यासाठी योगासने, प्राणायाम आणि मेडिटेशन घेण्यात आले. तसेच महिलांनी सक्षम बनुन त्यांना स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे. या हेतूने महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. डिफेन्स अकॅडमीचे संस्थापक समरेश शेळके , प्रशांत म्हात्रे, सनी शेलार, अनिकेत म्हामुणकर व प्रशिक्षक अक्षय पाटील, अमिषा भगत, हर्षल अहिरे, करण एखारे यांनी स्वसंरक्षण कलेबाबत मार्गदर्शन केले व प्रशिक्षण दिले.