मुरुड शहरात महिलांची दुर्गा माता दौड

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड शहरातील महिलांकडून दुर्गा माता दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून दुर्गामाता दौडीचा प्रारंभ मुरुड नगरपरिषद येथून करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी महिलांनी शिवछत्रपती महारांजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून भगवा ध्वज हाती घेऊन सुरुवात करण्यात आली. संपूर्ण शहर जय भवानी जय शिवाजी घोषणांनी दणाणून गेला. भारत माता की जय घोषणा देत महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर दौड करण्यासाठी उतरल्या होत्या. अनेक ठिकाणी या दौडीचे स्वागत पुष्पवृष्टी ने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीलांबरी हणमंते, समिधा उपाध्ये, अस्मिता पेंडसे, इशा चांदोरकर या महिलांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version