। कोर्लई । वार्ताहर ।
जगदगुरुश्रीस्वामी नरेंद्र महाराज संप्रदायातर्फे मुरुड तालुक्यातील उसरोली फाटा येथील पंचक्रोशी आगरी समाजाच्या हॉलमध्ये जिल्हास्तरीय महिला मेळावा संपन्न झाला. मेळाव्याला संपूर्ण जिल्ह्यातून भाविक व भक्तगण विशेष करून महिला भक्त गणांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज आणि परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग तालुक्यातील उसरोली फाटा येथील पंचक्रोशी आगरी समाजाच्या हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला साधना शिंदे, सिमाताई पाटील, वसंत राऊत, सुधीर पुलेकर, अंजली जगताप, भरत थिठे, चंद्रकांत लोणशीकर यांसह सर्व तालुका अध्यक्ष व महिला अध्यक्षा यांसह महिला भाविक भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी उपस्थित होते.







