। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा नियोजन भवन अलिबाग रायगड येथे जिल्हाधिकारी कार्यालय तर्फे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाने विशेष संक्षिप्त पूर्नरिक्षण कार्यक्रम 2022 अंतर्गत पद्धतशीर मतदार साक्षरता आणि निवडणुकीत सहभाग मोहीम जिल्हा स्तरीय महिला मेळावा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास रायगड डॉ. नितीन मंडलिक, जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड स्नेहा उबाळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे, जिल्हा परिविक्षा अधिकारी शकुंतला वाघमारे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, विस्तार अधिकारी अपर्णा शिंदे, रंजिता थळे, पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील, कुमुदिनी मोकल, गीताई कटोर तसेच मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. सदरील कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानाच्या प्रतिज्ञेचे वाचन करून करण्यात आली. यावेळी जिल्हा परीविक्षा शकुंतला वाघमारे यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जिल्हा महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात येणार्या विविध योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले.







