। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचा महिला क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बांगलादेश दौर्यावर जाणार आहे. दि. 28 एप्रिल ते 9 मे या कालावधीत ही मालिका खेळवली जाणार आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ 23 एप्रिलला बांगलादेशात पोहोचेल आणि 10 मेला भारताकडे रवाना होईल. सर्व सामने सिल्हेट येथे खेळवले जाणार आहेत. दरम्यान, मागील वर्षी भारतीय संघ जेव्हा बांगलादेशात गेला होता तेव्हा ती मालिका नाना कारणांनी चर्चेत राहिली होती. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरला वादग्रस्त निर्णयावर बाद दिल्याने नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक 28 एप्रिल- पहिला सामना- सिल्हेट 30 एप्रिल - दुसरा सामना - सिल्हेट 2 मे - तिसरा सामना - सिल्हेट 6 मे - चौथा सामना - सिल्हेट 9 मे - पाचवा सामना - सिल्हेट