| पुणे | वृत्तसंस्था |
पुणेकर प्रत्येक गोष्टीसंदर्भात वेगळेच असतात. नवनवीन चांगल्या प्रथा राबवण्यात देशात पुणेकरांची आघाडी असते. यामुळेच ‘पुणे तेथे काय उणे’, असे म्हटले जाऊ लागले. मग लोकसभा निवडणुकीचा ‘माहौल’ असताना पुणेकर मागे कसे राहणार? लोकसभा निवडणुकीत जनजागृतीचा अनोखा फंडा पुणे शहरातील वधू-वरांनी राबवला. आंबगाव तालुक्यातील जवळे गावात अक्षय लोखंडे आणि उत्कर्षा घोडेकर यांच्या विवाह झाला. याविवाहाची तयारी सुरू असताना नवरदेवाची स्वारीही आली. यावेळी वरातीत मतदान करण्याचा संकल्प करण्यात आलेले बॅनर्स होते. मतदान जनजागृती फेरीतील विद्यार्थ्यांनी वर्हाडी मंडळीला मतदानाचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत सर्वांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.