कोरोनाची संख्या घटली
| नवी दिल्ली |वृत्तसंस्था |
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आपल्या सर्व कार्यालयांमध्ये कर्मचार्यांच्या 100 टक्के उपस्थितीचा आदेश जारी केला आहे. सोमवारपासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने कर्मचार्यांनी कार्यालयीन हजेरीत कायम मास्क घातलेला असवा. विभाग प्रमुखांनी यावर लक्ष द्यावं, अशी सूचना जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. अप्पर सचिव पदाच्या खालील कर्मचार्यांपैकी 50 टक्के कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करण्याचा कालावधी फेब्रुवारीपर्यंत वाढवल्याचे निर्देश केंद्र सरकारने 31 जानेवारीला दिले होते. पण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारने निर्णय बदलला आहे. आता यापुढे कुठल्याही कर्मचार्याला वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळणार नाही, असे केंद्र सरकारने आदेशात स्पष्ट केले आहे.
सोमवार म्हणजे 7 फेब्रुवारीपासून सर्व कर्मचार्यांची कार्यालयीन हजेरी सुरू होईल. यानुसार सर्व केंद्र सरकारी कर्मचार्यांना कार्यालयात येऊन काम करावे लागेल. आता नियमितपणे सर्व कर्मचार्यांची कार्यालयात 100 टक्के उपस्थिती राहील, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी स्पष्ट केले.
देशात करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्व सरकारी कार्यालये आता पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत. देशात कररोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात असल्याने सुप्रीम कोर्टाने आता फिजिकल सुनावणी सुरू करावी, अशी मागणी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने सरन्यायाधीशांकडे केली. कोर्टा खुल्या वातावरणात सुनावणी घेणं ही परंपरा आणि घटनात्मक आवश्यकता असे दोन्ही मुद्दे असल्याचे बार असोसिएशनने म्हटले.
