मुरुड आगारातील कंट्रोल रूमचे काम पूर्ण

प्रवासी वर्गाला दिलासा
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड एसटी आगारातील कंट्रोल रूम व प्रवासी शेडचे काम पूर्ण झाल्याने प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुरुडमध्ये निसर्गचक्री वादळामुळे प्रवासी शेडचे सर्व लोखंडी पत्रे उडून गेल्याने प्रवाशांना ऊन व पावसाचा मारा सहन करावा लागत होता. याबाबत स्थानिक लोकांनी पत्रकरांशी संपर्क साधल्यावर या बातम्या सर्व वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्यावर एसटीचे विभागीय कार्यालय रामवाडी पेण येथून विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी स्वतः या प्रकरणाकडे लक्ष देत तातडीने सदरचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे प्रवासीवर्ग व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केला आहे.

Exit mobile version