| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुडला जोडणाऱ्या एकदरा पुलाला 62 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. वाढत्या रहदारीला भार सोसणाऱ्या आणि अत्यंत महत्त्वाचा असलेला पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. एकदरा पुल 62 वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने या पुला वरचे सुरक्षित कठडे व बेरींग पुर्णतः खराब झाल्याने हा पुल धोकादायक बनला होता. या पुलावरून एकदरा, माझेरी, राजपुरी, खोरा, डोंगरी या गावातील सर्व ग्रामस्थ रोजच्या रोज या पुलावरून मुरुड शहराकडे रोज ये-जा करित असतात. पुलाची दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांसह पर्यटकांनी नाराजी दर्शवली होती यांची दखल राज्य सरकारने घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत या पुलाच्या दुरुस्ती करिता 4 करोड रुपये मंजुर करुन हे काम ठाणे येथील संरचना या कंपनीला देण्यात आले होते. या कामाला 20 जानेवारी 2024 पासुन सुरुवात झाली होती. परंतु, झालेला कामाचा बिल ठकीत आसल्याने हे काम 20 ऑक्टोबर 2024 पासुन हे बंद होते. आज पुन्हा ठेकेदारांनी पुलाच्या कामाला सुरुवात केल्याने जनतेने निःश्वास सोडला.
एकदरा पुलाच्या कामाला सुरुवात
