काशिद पुलाच्या कामास सुरूवात ; शेकापच्या पाठपुराव्याला यश

रेवदंडा | वार्ताहर |
अतिवृष्टीने वाहून गेलेल्या काशिद साकव पुलाच्या कामास तातडीने सुरूवात करण्यात आली असून, लकवरच साकव पुलाचे काम पुर्ण होऊन वाहतुकीस खुला होईल, असे सांगण्यात येते. हा पूल तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी नुकतीच राज्य सरकारकडे केली होती.

काशिदच्या या दुर्घटनाग्रस्त साकव पुलाची राज्याच्या मंत्री व जिल्हाच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता राहुल मोरे व शासकीय अधिकारीवर्गासह भेट देऊन पाहणी केली होती. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यास साकव पुलाचे काम तातडीने सुरू करून वाहतुकीस खुला करण्याची सूचना शासकीय अधिकारीवर्गास दिली होती. त्यानुसार काशिद येथे अतिवृष्टीत वाहून गेलेल्या पुलाचे कामास सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरूवात केली असून, लवकरच साकव पुलाचे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीस खुला होईल, असे सांगण्यात येते. तूर्तास अलिबागहून मुरूडकडे जाण्यासाठी सुपेगाव या मार्गाचा अवलंब केला जात आहे.

Exit mobile version