तळा-रोहा रस्त्याचे काम सुरू

| तळा । वार्ताहर ।
तळा-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हा दोन तालुक्यांना जोडणारा दळण वळणाचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.या रस्त्यावरील वाली ते तांबडी या दरम्यानच्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले होते.त्या दरम्यानच्या रस्त्यावरून वाहन चालविणे मोठे जिकरीचे व कसरत करून चालवावे लागत होते.

सर्वत्र पडलेल्या खड्डयांमुळे प्रवास करणेही कठीण होत होते.नोकरी व व्यवसायानिमित्त या रस्त्यावरून नेहमी प्रवास करणारे नागरिक रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पुरते वैतागले होते.काही महिन्यांवरच पावसाळा येऊन ठेपला आहे.मात्र या सर्व गोष्टींचा विचार करून पावसाळ्यापूर्वीच शासनाने रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशी, नागरिक, वाहनचालक यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. या रस्त्याचे काम वेगाने सुरू असून काही काळावधीतच काम पूर्णत्वाकडे जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

Exit mobile version