| रेवदंडा | प्रतिनिधी |
चौल-आग्राव रस्ता नुतनीकरणास प्रारंभ झाला असून काही ठिकाणी क्रॉकिटीकरण सुद्धा झाले आहे. मात्र, या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. तसेच, हे काम अत्यंत संथ गतीने होत असून चौल-आग्राव पंचक्रोशीतील विद्यार्थी, ग्रामस्थ व प्रवासीवर्गाचे बेहाल होत आहेत. एकूणच दोन वर्षांपुर्वी मंजूर झालेले काम ठेकेदार वेळेत पुर्ण न करता मनमानी करत असल्याची संप्तत प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
चौल-आग्राव रस्ताला निधी मंजूर होऊन दोन वर्षे उलटली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हे काम सुरू करण्याची ठेकेदाराला निविदा प्राप्त झाली होती. परंतु, तेव्हाही काम सुरू करण्यात आले नाही. पर्यायी रस्ता नसल्याने ऐन पावसाळ्यात काम पुर्ण करता आले नाही. त्यामुळे दिवाळी पुर्वी सुरू झालेले चौल-आग्राव क्रॉकिटीकरणाचा रस्ता 6 महिने उलटून गेले तरी अद्यापी पुर्ण झालेला नाही. परिणामी आग्राव-अलिबाग एस.टी. बसेस बंद असल्याने विद्यार्थीवर्गाचे खुप हाल होत आहेत. तसेच, ग्रामस्थ व प्रवासीवर्ग यांचेही बेहाल झाले आहेत. ठेकेदाराने ठिकठिकाणी रस्त्यातच मटेरीयल टाकले असल्याने दुचाकी व तिनचाकी वाहनांच्या अपघाताला ते निमत्रंण ठरत आहे. एकूणच ठेकेदाराच्या मनमानीने चौल-आग्राव रस्ता नुतनीकरण संथ गतीने होत असून संबधीत खात्याने लक्ष्य देऊन त्या ठेकेदारास कामाच्या पुर्ततेचा कालावधी जाहीर करावा. अन्यथा त्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून हे काम काढून घेण्यात यावे, अशी मागणी पंचक्रोशीतून सर्व थरातून केली जात आहे.







