दहिवली पुलाचे काम संथ गतीने

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील उल्हासनदीवर असलेल्या दहिवली मालेगाव येथील पुलाचे काम गेली दोन वर्षांपासून सुरु आहे. या पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असून, या पुलावरून दरवर्षी महापुराचे पाणी वाहून जात असते. हे पुलावरून पाणी गेल्यानंतर त्या काळात पुलावरील वाहतूक बंद होते.

तालुक्यातील कळंब, नेरळ, माथेरानला जेडणारा राज्य महामार्ग जात असल्याने या महामर्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. या राज्य महामर्गावर अनेक गाव तसचे वाड्या जोडल्याने यांचा मोठ्या प्रमणात संपर्क येत असून, नेरळ शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दहिवली नवीन पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून संथ गतीने पाहायला मिळत आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने या ठिकाणी पुर्वी उभारण्यात आलेला पुल आहे. याची उंची कमी असल्याने मुसळधार पाऊस पडल्यानंतर हा पुल पाण्याखाली जातो यामुळे अनेक गाव खेड्यांचा संपर्क तुटतो. यामुळे या गाव खेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना दोन ते तीन दिवस आपल्या घरामध्ये बसून राहावे लागते. दोन वर्षांपासून या पुलाचे कामाला सुरुवात झाली आहे. उल्हासनदी वरील या पुलाचे भागाचे आतापर्यंत खांबे उभारण्यात आले असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र, हे काम संथ गतीने चालू असल्याने प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे.

Exit mobile version