मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा सिडकोचा संकल्प
| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा खारघर खाडीवर उभारल्या जाणाऱ्या 1.1 किलोमीटर खाडी उड्डाण पुलाचे काम वेगात सुरु असून, पावसाळा मेअखेरपर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले करण्याचा संकल्प सिडकोने केला आहे. या पुलामुळे तळोजा फेज एक येथील भुयारी मार्गातील ताण कमी होणार आहे.
ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. खारघरवरून पेंधर उड्डाण पुलादरम्यान जोडण्यात येणाऱ्या तळोजा खारघर खाडीपुलावर 96 कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या पुलाचे काम वेगात सुरु आहे. येत्या पावसाळापूर्वी म्हणजे मेअखेरपर्यंत सदर खाडी पूल उभारून सिडकोने खारघर वसाहतीनंतर तळोजा वसाहत निर्माण केली. वसाहतीच्या वाढत्या विकासामुळे नागरिक या ठिकाणी घरे घेऊन वास्तव्याला सुरुवात केली, वसाहतीमधील वाढत्या लोकसंख्येमुळे रहिवासियांचा प्रवास सुखकर व्हावे यासाठी तळोजा वसाहत फेज एक या ठिकाणी रेल्वे रुळाखालील भुयारी मार्ग उभारला. दरम्यान, सिडकोकडून फेज 2 मधील गृह निर्माण प्रकल्पातील वाढत्या लोकसंख्येमुळे सिडकोने अनेक वर्षे खितपत पडलेल्या पंधर पुलाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र, तळोजा खाडी पुलाचे काम केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानगीमुळे रखडले होते.
मागील वर्षी परवानगी प्राप्त होताच सिडकोने वाहतुकीसाठी खुले करण्याचा सिडकोचा संकल्प असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सिडकोकडून तळोजामध्ये मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. तळोजा खाडी पुलाच्या कामाने वेग घेतला असू तुर्भे खारघर लिंक रोडच्या कामाला सुरुवात झाली आहे, तुर्भे खारघर लिंक रोड मुळे खारघर वरून तळोजा वसाहतीत विना अडथळा जाता येणार असल्यामुळे सिडकोकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तळोजा वसाहती मधील सेक्टर-28,29,31,34,36,3940 मध्ये उभारल्या जाणाऱ्या गृहनिर्माणाचे गृह प्रकल्पाला नागरिकाचे प्रवास सुखकर होणार आहे. तळोजा वसाहतीत प्रवेश करण्यासाठी सिडको आणि रेल्वेच्या माध्यमातून तळोजा शीघ्र कृती दल समोरील रेल्वे ट्रक खालून तळोजा फेज एक वसाहतीत प्रवेश करण्यासाठी भुयारी मार्ग उभारले आहे. भुयारी मार्गातून तळोजा फेज एक आणि दोन वसाहतीत एनएमएमएमटी बसेस तसेच रिक्षा आणि खाजगी वाहनातून नागरिक प्रवास करतात खारघर खाडी पुलाचे काम पूर्ण झाल्यास थेट खारघर वरून तळोजा फेज दोन वसाहतीत प्रवेश करता येणार असल्यामुळे भुयारी मार्गावरील ताण कमी होणार आहे.







