श्रीमंत पेशवे स्मारकाचे काम प्रगतीपथावर

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन हे पहिले पेशवे श्रीमंत बालाजी विश्‍वनाथ पेशवे यांचे जन्मगाव येथे प्राचीन पेशवे स्मारक होते. आता त्या स्मारकाची पुनर्बांधणी करणे, परिसर सुधारणा करणे, पर्यटक सुविधा करणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प श्रीवर्धन नगर परिषदेने हाती घेतला आहे. या कामाचे भूमीपूजन दि.10 मार्च 2024 रोजी श्रीमंत पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा यांच्या विशेष उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न झाले होते.

या प्रकल्पाचे काम आता श्रीमंत पेशवे यांच्या मूळ भूमीवर वेगाने सुरु असून, प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिय पर्यटन विकास योजना या लेखाशीर्षाखाली सदरचे काम होत असून, या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम रु.5,97,27,415/-इतकी आहे. सदरचे काम मे.व्हिज्युअल बेंचर, मुंबई यांस देण्यात आले असून, कामाची विहित मुदत 730 दिवस आहे, अशी माहिती न.प.कडून मिळाली. श्रीमंत पेशवे स्मारक मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर तर एक ऐतिहासिक शहर म्हणून पर्यटकांचा ओघ आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल यात शंका नाही.

Exit mobile version