| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर गावात सांडपाणी वाहून नेण्यासाठी भुयारी गटारांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 15वा वित्त आयोगाच्या निधीतून ही कामे सुरू आहेत. चिरनेर गावात सात पाडे असून, गावात सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांची व्यवस्था मागील काही वर्षांपूर्वीच करण्यात आलेली आहे. मात्र, मधीलपाडा, कुंभार पाडा, मुळपाडा, खारपाटीलआळी साईनगर कातळपाडा तसेच गावातील अन्य भागात बांधण्यात आलेल्या भुयारी गटारांमधून सांडपाण्याचा व्यवस्थितरित्या निचरा होत नसल्यामुळे हे गटाराचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. नागरिकांच्या तक्रारीनुसार चिरनेर ग्रामपंचायतीने ही गंभीर बाब लक्षात घेऊन, या भुयारी गटारांच्या कामाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन, मोठ्या व्यासाची पाईपलाईन गटारे बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
गटारांची कामे युद्ध पातळीवर सुरू
