| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्ह्यामध्ये चिटणीस मंडळासह वेगवेगळ्या आघाड्याच्या पदाधिकारी सभासदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पक्षाने कार्यकर्त्यांनी चांगली संधी दिली आहे. त्यापध्दतीने प्रत्येकाने काम केले पाहिजे. पक्षाची ध्येय-धोरणे तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम केले पाहिजे. महिलांसह विद्यार्थी, कामगार, शेतकरी, युवकांच्या प्रश्नांची सोडवणूक आघाडीच्या माध्यमातून केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका सोप्या जातील.
मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. ते कायम राहवे, यासाठी काम करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी पनवेल, अलिबाग, कर्जत, पेण, महाड, खालापूर, उरण, रोहा व माणगाव या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आहे. बुथ अध्यक्षाची नेमणूक करून त्या पध्दतीने काम करण्याचा मानस आहे, असे शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी व्यक्त केले.







