| नेरळ | वार्ताहर |
कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ ग्रामपंचायतीची स्मशानभूमी आहे. त्या ठिकाणी सिमेंट बांधकाम असलेली स्मशान भूमी शेड बांधण्याच्या कामाला गती आली आहे. स्थानिक आमदाराने नेरळ स्मशानभूमी तसेच लाकडे ठेवण्यासाठी जागा यासाठी 70 लाखांचा निधी दिला असून त्या निधी मधून तेथे कामे सुरु असून प्रगतीत आहेत. दरम्यान सध्या तात्पुरत्या स्वरूपात नेरळ ग्रामपंचायतीने बाजूला दोन स्टॅन्ड उपलब्ध करून दिले असून तेथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.
नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत साधारण 30 हजार हुन अधिक लोकवस्ती असून या गावाची वाढ दररोज सुरु असून नेरळ ग्रामपंचायतीकडे असलेली एकमेव स्मशानभूमी अपुरी पडत आहे. त्यात पूर्वीचे स्मशानभूमी शेड हे पत्र्याचे असल्याने दरवर्षी त्या शेड ची दुरुस्ती करावी लागत होती. कधी कधी स्मशानभूमी असलेले तीन स्टॅन्ड देखील कमी पडत असल्याने प्रशस्त स्मशानभूमी शेड उपल्बध करून देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीचे मागणीनुसार कर्जतचे स्थानिक आमदार यांनी नेरळ ग्रामपंचायत स्मशानभूमी साठी निधी मंजूर केला होता. 70 लाखांच्या निधीमधून लाकडे ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली बांधण्यात आली असून स्मशानभूमी साठी आरसीसी बांधकाम करून प्रशस्त स्मशानभूमी शेड बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
नव्याने बांधण्यात येत असलेल्या समशानभूमी शेड मध्ये एकाच वेळी तीन मृतदेह जाळण्याची व्यवस्था सोनार आहे. त्याचवेळी सध्या अस्तिवात असलेली तात्पुरताती बनवलेली स्मशभूमी हि देखील भविष्यात मदतगार ठरणार आहे. मात्र नवीन बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा नेरळ ग्रामस्थांना असून आरसीसी बांधकाम करून स्मशानभूमी शेड बांधण्यात येत असल्याने पुढील काही वर्षे स्मशानभूमी मध्ये अतिरिक्त खर्च करण्याची जबाबदारी नेरळ ग्रामपंचायतीवर येणार नाही.