खोपोली अपघातात मजुराचा मृत्यू

। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र 4 वरून बिहारहुन कामासाठी आलेले मजूर खोपोलीच्या दिशेने रिक्षाने जात असताना शेंडीवली फाटा येथे पहाटेच्या दरम्यान एका टेंपो ने रिक्षाला धडक दिल्याने जबर अपघात झाला. या अपघातात रिक्षात बसलेला प्रवासी मजूर जागीत ठार झाला. तर त्याच्या सोबत असणारे जखमी झाले आहेत. हाताला काम मिळविण्याच्या शोधात आलेल्या मजुरांवर जीव गमवण्याचे संकट आले. बिहार राज्यातून खोपोली येथे कुटुंबाच्या उदरनिर्वाह करणयासाठी हाताला काम मिळविण्यासाठी आपल्या सहकारी वर्गासोबत आल्याने पनवेल येथून पहाटेच्या दरम्यान रिक्षा क्र. रिक्षा एम एच 05 डी क्यू 2878 खोपोली च्या दिशेने येत असताना मुंबई बाजूकडे भरधाव वेगात येणार्‍या दुधाच्या टँकरने रिक्षाला शेडोली फाटा येथे पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान रिक्षाला धडक देऊन तीन प्रवासी व चालक यांना मार बसला. त्यातील पासवान या मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह अन्य दोन प्रवासी जखमी झाल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी पाठविण्यात आले.

Exit mobile version