| पाली | निशांत पवार |
पाली-खोपोली राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. शुक्रवारी (दि.3) दुपारी या मार्गावर चिवे जांभूळपाडा येथे लेक व्ह्यू हॉटेलजवळ एका कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक रोहित ताडकर (रा. रोहा) याचा जागीच मृत्यू झाला आहे.
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाचे नुकतेच रुंदीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे भरधाव वेगाने वाहने जात असतात. या मार्गावर चिवे जांभूळपाडा या गावच्या हद्दीत दुपारच्या सुमारास पालीकडून खोपोलीकडे जाणाऱ्या एका कारने खोपोली बाजूकडून पालीकडे येणाऱ्या व रोहा या ठिकाणी जाणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला.