| पनवेल | वार्ताहर |
डंपरच्या धडकेने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गव्हाण फाटा परिसरात घडली आहे. गव्हाण फाट्याजवळील जुना रोडवर चंदन जगबहादूर राम (31) या ठिकाणी साईटवर काम करीत होता. साईटवर मातीचा भराव करण्यासाठी माती भरुन आलेल्या डंपरवरील चालकाने तो चालवित असलेला डंपर हा माती टाकण्यासाठी पाठीमागे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने जोरात रिव्हर्स घेत असताना सदर डंपरची धडक या कामगाराला बसल्याने त्यात तो जमिनीवर पडून मातीने भरलेल्या डंपरचे चाक त्याच्या अंगावरुन गेल्याने त्यात तो दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.