सीडब्ल्यूसी, हिंद टर्मिनलविरोधात कामगारांचे आंदोलन

| उरण | वार्ताहर |
भेंडखळ-उरण येथील सीडब्ल्यूसीच्या मालकीच्या जागेवर गेल्या 15 वर्षांपासून भाडेतत्त्वावर हिंद टर्मिनल व्यवस्थापनाने याठिकाणी आपला व्यवसाय केला. परंतु, करार संपल्यानंतर कामगारांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कंपनी बंद करण्यात येत आहे. त्यामुळे शेकडो कामगार बेरोजगार होणार आहेत. त्यांचा प्रश्‍न आधी सोडवावा, त्यानंतरच मशीनरी हलवावी, असा पवित्रा येथील कामगारांनी घेत कंपनीच्या गेटसमोर आंदोलन छेडले आहे.

दरम्यान, या कंपनीत सर्विअर लेबर सफाई कामगार फोरक्लिप कामगार अशाप्रकारे जवळजवळ सहाशे कामगार कार्यरत आहेत. त्यांच्या कामाचा कोणताही मोबदला न देता किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना ने देता व्यवस्थापन मशनरी हलवण्याचा प्रयत्न करीत होती. त्या सी-फेस मधील जवळजवळ सहाशे कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. सीडब्ल्यूसी व्यवस्थापनाने येथील बेरोजगार होणार्‍या लोकांचा रोजगाराचा प्रश्‍न सोडवावा, त्याचप्रमाणे हिंद टर्मिनल व्यवस्थापन बेरोजगार होणार या लोकांना नुसकान भरपाई देण्याची मागणी कामगार संघटनांनी आपल्या निवेदनात केली आहे.

जोपर्यंत कामगारांना नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत येथील कोणत्याही प्रकारची मशनरी हलवण्यात येणार नाही, असे प्रतिपादन कामगार संघटनेचे नेते महेंद्र घरत व भूषण पाटील यांनी केले. यावेळी असंख्य कामगार नेते उपस्थित होते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version