पगाराविना कामगारांची उपासमार

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा

| रसायनी | वार्ताहर |

पाताळगंगा औद्योगिक परिसरातील पौद गावाजवळ घरगुती सिलिंडर बनविण्याचा कारखाना असून, या ठिकाणी येथील स्थानिक कामगार काम करीत आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना पगारापासून वंचित ठेवून कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे येथील कामगारांनी साखळी उपोषणांचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे कामगारांनी सांगितले. तसेच येथील एक महिला कामगारांना अरेरावीची भाषा वापरत असल्याने येथील कामगार संतप्त झाले आहेत.

या कारखान्याचे पूर्वीचे नाव सनुज स्टील, आता कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड या नावाने संबोधले जात आहे. या कारखान्यात कोकण श्रमिक संघ, संलग्र हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिल श्रुतीताई श्याम म्हात्रे यांची युनियन असून, त्यांच्या नेतृत्वाखाली या कामगरांनी आंदोलनांचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरुच राहणार असल्याचे येथील कामगारांनी सांगितले. यावेळी या परिसरातील स्थानिक कार्यकर्त्यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांचा मनोबल वाढण्यासाठी पाठिंबा दिला.

गेले दोन महिने पगार मिळत नसल्यामुळे घरचे भागविणे मोठ्या कष्टाचे जात आहे. त्यातच व्यवस्थापक आडमुठे धोरण स्वीकारत असल्यामुळे आम्ही जगायचे कसे, या कारखान्यात काही महिन्यात दीड लाखापेक्षा जास्त घरघुती सिलिंडर तयार केले जात आहे. मात्र, दोन महिने मागणी कमी झाल्यामुळे कामगार कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कामगारांच्या पायाखालची वाळू सरकली असून, पर्याय मार्ग म्हणून साखळी उपोषणाचे हत्यार काढले असल्याचे युनियन कामगार प्रमोद काठावले, रणधीर पाटील, संतोष भोईर, संदीप काठावले, दत्तात्रेय गारुडे, अरुण भोईर, रोहिणी टेंबे, दीपक जाधव यांनी सांगितले.

Exit mobile version