स्वच्छतेसाठी कामगार एकवटले

| कर्जत | प्रतिनिधी |

सह्याद्रीच्या कुशीतील टुमदार पर्यटनस्थळ असलेले माथेरान स्वच्छतेच्या बाबतीत युनिक असून, या ठिकाणी विकेंडच्या दिवसात लाखो पर्यटक भेट देत असतात. यामुळे याठिकाणी स्वच्छतेबाबतीत विशेष काळजी घेत माथेरान नगरपरिषद स्वच्छता अभियानातदेखील आपली छाप उमवटत असते. या चालू वर्षात सुरु असलेल्या स्वच्छता अभियानात अव्वल येण्यासाठी पालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या कोकण श्रमिक संघाच्या वतीने दि.9 रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.

शहराची दररोज स्वच्छता ठेवणारे कंत्राटी सफाई कामगार, बांधकाम विभागाचे कंत्राटी कामगार तसेच उद्यानाची निगा राखणारे माळी कामगार यांनी कोकण श्रमिक संघाच्या कामगार नेत्या श्रुती म्हात्रे तसेच माथेरान युनिटच्या अध्यक्षा प्रिया वहालकर (शिंदे) यांच्या मार्गदर्शनाखाली सल्लागार दिनेश सुतार यांच्या नेतृत्वाखाली शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका ते अमनलॉज रेल्वे स्थानकापर्यंत प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक ग्लास, प्लेट, पिशव्या, रस्त्यावर अस्तव्यस्त पडलेली घोड्याची लिद स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात गोळा करत येथील परिसर स्वच्छ केला.

याप्रसंगी माथेरान नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक नरेंद्र सावंत, अन्सार महापुळे, ज्ञानेश्वर सदगीर, अर्जुन पारधी, रामचंद्र चव्हाण, कैलास सोनवळे, कोकण श्रमिक संघांचे उपाध्यक्ष बाळू सांबरी, विश्वास सातपुते, संजय गोळे, विष्णू पारधी, देहू सांबरी, चंद्रकांत सांबरी, गोविंद सांबरी, गोविंद पारधी, किशोर, बुधाजी पारधी, निलेश मढे, शोभा शिंदे, विद्या सातपुते, शालिनी शिंदे आदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version