| वाघ्रण | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथे शुक्रवार, दि. 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता आंबा कृषी शेतकरी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पेढांबे येथील समाज मंदिरात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
विजय पाटील टेरिटरी इन्चार्ज ठाणे व सर्व कृषी निविष्ठा विक्रेता अलिबाग व नयन पाटील कृषी विक्रेता फोफेरी यांच्यामार्फत विलोवूड केमिकल लि. या कंपनीने हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत डुमरे जनरल मॅनेजर विलवुड केमिकल लि. व त्यांचे सहकारी राहुल पवार एरिया मॅनेजर पुणे रीजन हे उपस्थित होते. तसेच अलिबाग कृषी अधिकारी जी.बी. पाटील व आरसीएफ जिल्हा प्रमुख प्रभारी अमर घडवे आणि अलिबाग पंचक्रोशीतील आंबा बागायतदार व भाजीपाला पिकवणारे शेतकरी या कार्यक्रमास हजर होते.
कृषी अधिकारी जी.बी. पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व गणेश पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. निवेदक संजय पाटील (रांजणखार) यांनी प्रस्तावना करत आलेल्या प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन नयन पाटील यांनी स्वागत केले. चंद्रकांत डुमरे यांनी उपस्थित आंबा बागायतदार व शेतकर्यांना आंब्याच्या विविध रोग व कीटक प्रादुर्भावावर कृषी क्षेत्रातील अग्रणी व बहुराष्ट्रीय कंपनी विलोवूड केमिकल्स लि.तर्फे सद्यःस्थितीत उपलब्ध आंबा पिकाचे उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन व कंपनीच्या विविध औषधांची अनेक रोगावर माहिती व्हिडिओ क्लिप्स सादर केली. शेतकर्यांनी त्यांच्या मनातील शंका विचारुन कोणती औषधे केव्हा व कशी वापरावी याचे ज्ञान श्री. डुमरे यांच्याकडून घेतले. सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.