| कोर्लई | वार्ताहर |
महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींना त्यांच्या सुरक्षेसाठी महिला कायद्याची ओळख व्हावी तसेच शासनामार्फत देण्यात येणार्या विविध शिष्यवृत्तीची माहिती करून देण्यासाठी अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड जंजिरा येथे महिला विकास कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते.
प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. यावेळी डॉ. शेख यांनी आपल्या भाषणातून विद्यापीठ अनुदान आयोग व शासनामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणार्या विविध उपाययोजनांबद्दल माहिती दिली. या कार्यशाळेसाठी विधीज्ञ अॅड. विक्रांत पाटील, वकील जिल्हा सत्र न्यायालय, अलिबाग रायगड यांना प्राचारण करण्यात आले होते. त्यांनी महिला सुरक्षा कायद्यांची माहिती विद्यार्थिनींना करून दिली. नवाब शेख शिष्यवृत्ती, नोडल अधिकारी यांनी विद्यार्थिनींना शासनाच्या विविध शिष्यवृत्तीची माहिती करून दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोरमे निदा यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महिला विकास कक्ष प्रमुख डॉ. स्वाती खराडे, ग्रंथपाल अंजुम दाखवे व छापेकर अमरीन, फातिमा सुर्वे, हुमेरा घारे, अरफा कलबसकर, मदिहा कागदी, रिया ठाकूर यांनी परिश्रम घेतले.