| पनवेल | प्रतिनिधी |
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 01 येथे बुधवारी (दि.4) जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कर्करोगातून यशस्वीरीत्या बरे झालेल्या रुग्णांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मान्यवर डॉक्टरांनी कर्करोग विषयावर सखोल मार्गदर्शन करत वेळेवर तपासणी व उपचारांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमात कर्करोगातून बरे झालेल्या रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांच्या संघर्षमय अनुभवांना उजाळा देण्यात आला. या अनुभवांमुळे उपस्थितांना नवी प्रेरणा व आत्मविश्वास मिळाला. दरम्यान, जागरूकतेसोबतच आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.






