। उरण । वार्ताहर ।
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, महालण विभाग फुंडे प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यमाने जागतिक कांदळवन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आमोद ठक्कर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उरणचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री. कोकरे उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी उरणसाठी नुकतेच 1000 हेक्टर क्षेत्र मंजूर झालेले आहे. आता ते विकसित करायची सुरुवात लवकरच होईल. खेकडे, जिताडा व मासे उत्पादन यासाठी आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे सांगितले. निमिषा नारकर कांदळवन कक्ष अलिबाग यांनी कांदळवन सद्य परिस्थिती, त्यांची सागरी जैवविविधता टिकविण्यासाठीची आवश्यकता, जमिनीची धूप थांबविणे, प्राणवायू मोठ्या प्रमाणात पुरविणे, औषध म्हणुन गुणधर्म इत्यादी अनेक प्रकारे मानवाच्या कसे उपयोगि आहेत हे सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माननीय प्राचार्य डॉ पी. जी. पवार ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
