वर्ल्डकपची तयारी की आर्मी भरती

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

पाकिस्तान क्रिकेट संघाचे येत्या काही महिन्यातील वेळापत्रक बरेच व्यस्त आहे. आता त्यांना 18 एप्रिलपासून मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. त्यानंतर आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध देखील मालिका खेळायच्या असून त्यानंतर जूनमध्ये टी-20 वर्ल्डकपमध्येही पाकिस्तान संघ सहभागी होणार आहे. अशात या सामन्यांपूर्वी पाकिस्तानचा संघ मोठे कष्ट घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान संघ आर्मी ट्रेनिंग घेतानाही दिसला.

नुकताच पाकिस्तान क्रिकेटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे खेळाडू आर्मीप्रमाणेच ट्रेनिंग करताना दिसत आहेत. ते वेगवेगळे व्यायाम प्रकार करताना दिसत आहेत. त्याचबरोबर ड्रिल करतानाही दिसत आहेत. हे ट्रेनिंग त्यांनी अबोटाबादमधील आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग येथे घेतली आहे. पाकिस्तान संघाच्या या ट्रेनिंग दरम्यानचे अनेक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे खेळाडू मोठे दगड हातात घेऊन डोंगर चढत असल्याचेही दिसत आहे.

Exit mobile version