| अलिबाग । वार्ताहर ।
स्वदेस फाउंडेशनच्या डिजिटल स्वदेस उपक्रमांतर्गत दि.29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. यावेळी पेडियाट्रिक कार्डियाक सर्जन डॉ. भरत दळवी यांनी हृदयरोगावर दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी हृदयरोग कसे ओळखायचे, हृदयरोगावर कुठे आणि कोणत्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, उपचारानंतर कशा प्रकारे काळजी घ्यायची, याविषयी डॉ.दळवी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वदेस फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी केले. तर महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्र यादव यांनी प्रास्ताविक केले व जागतिक हृदयरोग दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक सुजित एल व अर्जुन बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले.