| उरण | वार्ताहर |
शिव प्रतिष्ठान करंजाडे यांच्यावतीने जागतिक जल दिनानिमित्त ‘मूठभर धान्य व घोटभर पाणी’ ही संकल्पना राबविण्यात आली. सध्या उन्हाळा चालू आहे. मुक्या प्राण्यांना सध्या पाणी मिळत नाही. तसेच, पक्षांना दाणे मिळत नाहीत. याचे भान ठेऊन शिव प्रतिष्ठानने स्वखर्चाने मुक्या प्राण्यांना पाणी पिण्यासाठी भांडी व धान्याचे पॉट लावण्यात आले आहेत. समाजापुढे माणुसकीचा आदर्श ठेवावा असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सत्यजित पाटील, प्रशांत निर्मल, संदीप पाटील, राकेश कुसले, प्रशांत शेट्टी, सचिन कुसले, अक्षय मोरे, श्रीकांत निर्मल, रजेश शेलार, अमर सावंत, सुनील अंबावडे, लक्समन घोडसिंगे, अमर कुसले, दिनेश टीमगिरे, शंतनू अथर्व, आनंद पुजारी, रोशन आदी मान्यवरउपस्थित होते.