वरळी हिट अँड रन प्रकरण

मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला मंगळवारी (दि. 9) अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी मिहीर शाह याला शहापूरमधून अटक केली आहे. याशिवाय त्याची आई आणि बहिणीलासुद्धा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. मिहीर शाह हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा असल्याचं सांगितले जात आहे. रविवारी पहाटे (7 जुलै रोजी) बीएमडब्लू वाहनानं दुचाकीवर जाणार्‍या एका दाम्पत्याला धडक दिली होती. या धडकेनंतर चालकाने महिलेला 100 मीटरपर्यंत फरफटत नेलं होतं. वरळीतील ट्रिया मॉलजवळ हा अपघात घडला होता. मॉलजवळच असलेल्या वरळी कोळीवाड्यात हे दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससून डॉकला मासे विकत घेण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना ही घटना घडली होती.

Exit mobile version