गौराईचे पारंपरिक पद्धतीने पूजन

| खोपोली | प्रतिनिधी |

गणरायाच्या आगमनानंतर वेध लागतात ते गौरीच्या आगमनाचे. शनिवारी ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचे मोठ्या थाटात घरोघरी आगमन पारंपरिक गौरी गीते गात झाले. सुहासिनींनी सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठ्या थाटामाटाने गौराईचे स्वागत केले.

घरातल्या सुवासिनींनी वाजत गाजत दारात आलेल्या गौराईची दृष्ट काढून तिला घरात आणली. यानंतर गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली.

कोकणात सकाळीच महिला जंगलात जाऊन गौराईची फुले टोपलीत घेऊन येतात. यावेळी पारंपरिक गाणी गायिली जातात. मात्र, जंगलात फुलांचा तुटवडा झाल्यामुळे गौरी अगदी 5 ते 10 इंचापासून ते दोन ते तीन फुटांपर्यंत काही ठिकाणी पुतळे असतात, तर काही ठिकाणी अगदी शालू, पैठणी नेसून गौरीला सजवण्यात येते. दागदागिने घालून या महालक्ष्मीचा शृंगार केलेला असतो. मराठी पंचांगानुसार भाद्रपद शुद्ध अनुराधा नक्षत्रावर षष्ठीला आगमन आवाहन झाले. सप्तमीला पूजन आणि अष्टमीला विसर्जन होणार आहे.

Exit mobile version