थोरवे भावकीची कुलदैवत पूजा

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील नांदगाव येथे याही वर्षी 1 मे रोजी थोरवे भावकीची कुलदैवतेची पूजा करण्यात आली .या पूजेनिमित रायगड भूषण बबन शिरोशीकर यांचे शिवव्याख्यानाचे आयोजन केले होते.त्यानी आपल्या शिवव्याख्यानातून तरुण पिढी व्यसना पासून दूर राहिली तर आपले उज्ज्वल करियर घडवू शकतो असे सांगितले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित घडामोडी सांगून संपूर्ण शिवमय वातावरण निर्माण केले.व्याख्यानंतर गावातील महिला मंडळीने सुस्ववर असे संगीत भजन सादर केले.यावेळी थोरवे भावकीचे मुबई, पुणे,ठाणे येथील सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

Exit mobile version